'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या! | Nawab Malik | Mumbai | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे लक्ष द्या!

मुंबई : नवाब मलिक म्हणाले की 'ब्लू टीक' आणि कोरोना लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा. 'ब्लू टीक' पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार 'ब्लू टीक' ची लढाई लढताना दिसत आहे, तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. ट्वीटरवरील 'ब्लू टीक' असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

#NawabMalik #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires